⚫हसून हसून पोट दुखेल रे बाबा फुल्ल मराठी कॉमेडी जोक्स (Marathi Comedy Jokes)-
चंदूच्या बायकोचं पत्र
चंदूच्या बायको ची मराठी थोडी कच्ची असते . तिला पूर्णविराम कुठे द्यायचा हे कळत नसते , तरी चंदूला पत्र लिहिले आणि मग पूर्णविराम देऊन टाकले मध्ये मध्ये ते असे ,,,
प्रिय प्राण नाथ , तुमची आठवण येते माझ्या मैत्रिणीला . काल मुलगा झाला आजीला . दम्याचा त्रास होतो कुत्र्याला. आज चार पिल्ले झाली मामाला . दाढी करताना ब्लेड लागले वहिनीला . दवाखान्यात दाखल केले बकरीला . हजार रुपयात विकले आत्याला . नमस्कार तुमची लाडकी गंगू ,,
*बायको:* तुम्ही रशिया किव्हा यूक्रेन ला गेले होते ?
*नवरा:* नाही.
*बायको :* आपण रहायला जाणार का ??
नवरा :नाही..
*पत्नी:* तिथे तुमचे नातेवाईक रहातात का ??
नवरा: नाही
बायको: मग तो TV चा रिमोट मला द्या …
😁😅😁
*पहिल्यांदा बैंक कर्मचारी होण्याचा फायदा सांगितला कुणी:*
काल एका लग्नाला गेलो होतो,
सहज पाहुण्यां सोबत गप्पा मारत होतो..
शेजारी एक आजीही बसल्या होत्या,
सहज म्हणाल्या माझी नात देखणी आहे शिकलेली आहे एकांद स्थळ बघा!
मी म्हणालो शिक्षक चालेल का?
आजी रागाने म्हणाली:- नगं, माझं दोन जावई मास्तर हाईत, सुट्टी पडल्या पासून हितच हाइत, *मेल्यांनी सासूरवाडीची शाळा करून टाकलीय... जरा बैंक बिंके वाला बघा,....... कारण, त्याला एकतर सुट्टी मिळतं न्हाई, कसं बसं तडजोड करून सकाळी सासुरवाडीला येतंय...अन संध्याकाळी ड्युटी हाय म्हणून निघून जातय..!*
🤣😂😅
😎माणूस कितीही मोठा असू द्या हो.........
आणी कितीही मोठ्या पदावर असू द्या....
😌 पण शेवटी..🙂
सासुरवाडीला त्याला बायकोच्या नावानेच ओळखतात.......
भुरीचा नवरा, नंदीचा नवरा, मीरीचा नवरा, झिंगीचा नवरा,बबलीचा नवरा....!
🤣😂😅
▪️हे पण वाचा -
🔸Full Marathi Comedy Jokes | मराठी विनोदी जोक्स पोट धरून हसाल
😅🤭🤪
खुप अवघड झालं जेंव्हा :
१. बायोलॉजीच्या शिक्षकांनी शिकवले की : सेल म्हणजे 'शरीरातील पेशी'
२. फिजिक्सच्या शिक्षकांनी शिकवले की : सेल म्हणजे 'बॅटरी',
३. इकोनॉमिक्सच्या शिक्षकांनी शिकवले की : सेल म्हणजे 'विक्री',
४. हिस्ट्रीच्या शिक्षकांनी शिकवले की : सेल म्हणजे 'जेल',
५. इंग्रजीच्या शिक्षकांनी शिकवले की : सेल म्हणजे 'मोबाइल',
शाळाच सोडुन दिली हा विचार करुन की जिथे ५ शिक्षकांचे एकमत नाही तिथे शिकुन काय उपयोग
*आणि*
खरं ज्ञान मिळाले जेव्हा पत्नीने सांगितले की सेल म्हणजे 'डिस्काउंट'😅😀 !!
😝😀😀
राजकारण | सरकारी योजना | शेअर मार्केट | World | Health | टेक्नॉलॉजी | Sports | व्यवसाय | महाराष्ट्र | इत्यादी विषयांवरील बातम्यांसाठी आमच्या सकाळ एक्सप्रेस या वेबसाईट ला भेट द्या
😁😂😃
शिक्षक:- उद्या गृहपाठ नाही केलास, तर कोंबडा बनवेल🐓🐔🐓🐔
पप्पू:- ओके सर,,,,,पण जरा झणझणीत बनवा😉😆
😂🤣😃
च्या मायला मला एक
कळत नाय
संतूर साबणाच्या जाहिरातीत लहान मुलांच्या आईच का दाखवतात ?
बाप का दाखवत नाहीत ? बाप काय निरम्याने आंघोळ करतो काय🤔😆
😂😁🤣
शाळेतील आठवणी
विद्यार्थी- सर याच्या पोटात दुखतंय, हा माझ्या घराच्या बाजूला राहतो याला घरी घेऊन जाऊ का? (6) किडेबाज डोनाल्ड गुरुजी
अखिल भारतीय तास चुकवू संगठना😂🤣😋
😅😄😃
पप्पू- अरे यार, या कोरोना वायरस वर काय
ईलाज नाही का ?
राहुल्या नाही रे.. वैक्सीन शोधायचं काम चालू आहे अजून..
पप्पू- अरे एवढंच ना.. आधी सांगायचं ना.. माझ्याकडं आहे की,
राहुल्या काय?
पप्पू - वॅसलीन ..
(मागं थंडी होती तेव्हा आणली होती डबी..)
राहुल्या चीन ला जाण्याच्या विचारात..
😂🤣😃
मित्रांनो हे विनोदी, कॉमेडी जोक्स (Marathi Comedy Jokes) वाचून तुम्ही नक्कीच आनंदी, फ्रेश, खूश झाले असणार. व आमचे जोक्स तुम्हाला नक्कीच आवडले असणार..
1 Comments
1 नंबर
ReplyDelete