जयदेव जयदेव श्रीमद्भागवता। श्रवणें मननें पठणें भक्ती ये हाता॥धृ॥
वेदाचें हें सार पाहे रसभरित।
दशलक्षण हें आहे लक्षीत॥ जय ॥१॥
द्वादश स्कंधामध्यें हरीची लीळा।
तिनशें पस्तिस अध्ये गाती गोपाळा॥ जय ॥२||
अठरा सहस्र श्लोक गाती ऐकती।
ज्यासी हरीभक्ती त्यासी तत्प्राप्ती॥ जय ॥३॥
गायत्रीचें मंत्ररूप हें पाहें।
परीक्षिति-शुकसंवाद आहे॥ जय ॥४॥
भागवतरूपी देवा तूंचि अहेसी।
करूं ही आरति एका-जनार्दनासी॥ जय ॥५॥ इति
0 Comments