🔘 नवरदेव-नवरीसाठी नवनवीन सुंदर मराठी उखाणे || स्त्रियांसाठी व पुरुषांसाठी मराठी सुंदर उखाणे || Marathi ukhane || Marathi ukhane girl and boy || वर-वधूसाठी मराठी उखाणे -
मित्रांनो आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी (Marathi ukhane) मराठी नवनवीन उखाणे. मित्रांनो कुठलाही कार्यक्रम असो, उदा. लग्न समारंभ , साखरपुडा , इथे तुम्हाला उखाणे घ्यायला लावतात. मग स्त्री असो किंवा पुरुष, तुम्हाला उखाणे घ्यावेच लागतात. म्हणून आम्ही या पोस्ट मध्ये वधू-वर दोघांसाठी मराठी नवनवीन उखाणे दिलेले आहेत, तर तुम्ही हे नक्की वाचा व आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका...
🔹 वधूसाठी मराठी उखाणे (Marathi latest ukhane ) नवरीसाठी सुंदर मराठी उखाणे || Marathi ukhane for female || girl Marathi ukhane || श्रियांसाठी मराठी उखाणे-
आशीर्वादाची फुले वेचावीत
वाकून,
........ रावांचे नाव घेते
तुमचा मान राखून.
🔸🔸🔸
संसाराच्या देव्हा-यात
उजळतो नंदादीप समाधानाचा,
……..रावांचे नाव घेऊन,
मागते आशिर्वाद अखंड
सौभाग्याचा.
🔸🔸🔸
नव्या नव्या
शालुचा पदर सांभाळताना
मन माझे भांबावते,
…………. च्या साथीने
नव जीवनाचे स्वप्न
मी रंगवते.
🔸🔸🔸
हळद असते पिवळी, कुंकू असते लाल,
.....रावांची
मिळाली साथ झाले जीवन खुशहाल.
🔸🔸🔸
कान भरण्यात बायका आहेत हौशी,
.... रावांचा नाव घेते हळदी कुंकूंच्या दिवशी.
🔸🔸🔸
हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी,
....रावांच नाव
घेते संक्रांतीचा दिवशी.
🔸🔸🔸
छत्रपती शिवाजी महाराज आहेत, स्वराज्याचा हिरा,
..रावांचे नाव घेऊन, उखाणा करते पुरा.
🔸🔸🔸
आयुष्यात सुख-दुःख, दोन्ही असावे,
…….रावांसारखे पती, जन्मो-जन्मी मिळावे.
🔸🔸🔸
दवबिंदूंनी चमकतो, फुलांचा रंग,
सुखी आहे संसारात,…….च्या संग.
🔸🔸🔸
मॉलमध्ये जायला तयार होते मी झटकन,
....रावांचे नाव घेते तुमच्यासाठी पटकन.
🔸🔸🔸
“वय झाले लग्नाचे, लागली प्रेमाची चाहूल,
...रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.
🔸🔸🔸
फुलले गुलाब गाली, स्पर्शात (डोळ्यात) धुंद झाली प्रीती,
....ची झाले मी जन्मोजन्मीची सौभाग्यवती.
🔸🔸🔸
नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा,
.....च नाव आहे लाख
रुपये तोळा.
🔸🔸🔸
धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा,
……. जीवावर करते मी मजा.
🔸🔸🔸
हिमालय पर्वतावर बर्फाचे खड़े,
…..रावांचे नाव घेते, आई बाबांपुढे.
🔸🔸🔸
हिरव गार सोण, पिकवल माती ने,
सुखाचा प्रवास करीन
…….रावांच्या साथीने.
🔸🔸🔸
सोण्याचा कप,
सोण्याची बशी,
प्रित जुळली,………रावांशी.
🔸🔸🔸
गोव्याहून आणले काजू ,
....... रावांच्या थोबाडित द्यायला मी कशाला लाजु.
🔸🔸🔸
मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय,
.........राव भाव देत नाही कित्ती केले ट्राय.
🔸🔸🔸
चांदीच्या ताटात साखरेचे पेढे,
........माझे हुशार, बाकी सगळे वेडे.
🔸🔸🔸
आग्रहाखातर नाव घेते, आशीर्वाद द्यावा,.
...... रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा.
🔸🔸🔸
सासरची छाया, माहेरची माया,
.........राव आहेत, माझे सर्व हट्ट पुरवाया.
🔸🔸🔸
बिझनेसमध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा,
उडवल्या लग्नात तरीपण .......रावांनी १०० च्या नोटा.
🔸🔸🔸
गणपती बाप्पा आहेत, शंकर पार्वतीचे सुपुत्र,
........रावांनी घातले मला, सर्वांसमोर मंगळसूत्र.
🔸🔸🔸
संसाराच्या सागरात प्रेमाच्या लाटा,
... .रावांच्या सुखदुःखात, माझा अर्धा वाटा.
🔸🔸🔸
मंगळसूत्र हाच, सौभाग्याचा दागिना खरा,
....... रावांचे नाव घेऊन, जपते मराठी परंपरा.
🔸🔸🔸
चांदीची जोडवी, लग्नाची खूण,
........ रावांचे नाव घेते, ची सून.
🔸🔸🔸
उखाणा घेते मी, खूपच Easy ,
........राव असतात नेहमी, कामामध्ये Busy.
🔸🔸🔸
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
…...रावाच्या नावाच मंगळसूत्र गळ्यात घालते प्रेमाने.
🔸🔸🔸
लाल लाल मेहेंदी, हिरवागार चुडा,
…रावांमुळे पडला माझ्या जीवनात, प्रेमाचा सडा.
🔸🔸🔸
निळे पाणी निळे आकाश, सर्वत्र सर्वत्र हिरवेगार हिरवे वन,
...…रावा चे नाव घेते माझे आहे त्यांच्यात मन.
🔸🔸🔸
मोगऱ्याच्या गजऱ्याचा मस्त सुटलाय सुगंध,
…....रावा सोबत मला मिळाला, जीवनाचा आनंद
🔹 वरासाठी मराठी उखाणे (Marathi Navin ukhane) नवरदेवासाठी मराठी नवनवीन उखाणे || Marathi ukhane for male || boy Marathi ukhane || माणसांसाठी मराठी उखाणे-
नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,
...झाली आज माझी गृहमंत्री.
🔸🔸🔸
हो-नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे,
..... मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे.
🔸🔸🔸
सिव्हिल इंजिनियर बनायला, लागले खूप कष्ट,
.......... च नाव घेतो, सर्वांसमोर स्पष्ट.
🔸🔸🔸
गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ,
सौ ...... ने दिला मला प्रेमाचा हात.
🔸🔸🔸
जाईजुईचा वेल पसरला दाढ,
.......बरोबर बांधली जिवनाची गाठ.
🔸🔸🔸
दवबिंदूच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग ,
सुखी आहे संसारात सौ .... च्या संग.
🔸🔸🔸
क्रिकेटच्या मॅच मध्ये, धोनी ने मारला Six,
… संगे मी सात जन्मांसाठी Fix.
🔸🔸🔸
ताजमहाल बांधणारे कारागीर कुशल,
........चे नाव घेतो सगळ्यात स्पेशल.
🔸🔸🔸
समुद्राचे पाणी लागते खूप खारे,
तुझ्यासाठी तोडून आणेन मी चंद्र तारे.
🔸🔸🔸
निळ्या निळ्या आकाशात, चमचमतात तारे ,
........ च नाव घेतो. लक्ष द्या सारे.
🔸🔸🔸
काय जादु केली.. जिंकलं मला एकाक्षणात,
.......प्रथम दर्शनीच भरली माझ्या मनात.
🔸🔸🔸
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने,
.........च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने
🔸🔸🔸
आंब्याच्या झाडावर बसुन कोकीळा करी कुजन,
......... माझ्या नावाचे करी पुजन.
🔸🔸🔸
परसात अंगण अंगणात तुळस,
......नाव घ्यायचा मला नाही आळस.
🔸🔸🔸
मोह नाही माया नाही, नाही मत्सर हेवा,
…………….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.
🔸🔸🔸
मोहमाया – स्नेहाची जाळी पसरली घनदाट,
…… बरोबर बांधली नवीन जीवनाची गाठ.
🔸🔸🔸
रखरखत्या वैशाखात प्रेमाचा घुंद वारा,
जीवनाचा खेळ समजला …... मुळे सारा.
🔸🔸🔸
रुप्याचा लोटा सोन्याची झारी,
असली काळी सावळी तरीही ...…. माझी प्यारी.
🔸🔸🔸
श्रावण महिन्यात प्रत्येक वारी सण,
…......ला सुखात ठेवी हा माझा पण.
🔸🔸🔸
श्री गणेशाच्या भेटीसाठी गौरी येते नटून,
……माझ्या संसारात आल्याने मी गेलो फुलून.
🔸🔸🔸
संतांचे वाङमय म्हणजे ‘सारस्वताचा सागर’,
…......म्हणजे प्रेमाचा आगर.
🔸🔸🔸
संसाराच्या सागरात पतीपत्नी नावाडी,
…....मुळे लागली मला संसाराची गोडी.
🔸🔸🔸
संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता,
साथ आहे माझ्याबरोबर …… सारखी सूर्यकांता !!!!!
🔸🔸🔸
संस्कृत काव्यात श्रेष्ट आहे जयदेवाच गीतगोविंद,
………च्या नावाचा लागलाय मला छंद.
🔸🔸🔸
खेळायला आवडतो, मला PUBG गेम,
.......वर आहे माझे खूप प्रेम.
🔸🔸🔸
एका वर्षात असतात महिने बारा,
.......च्या नावात समावलाय आनंद सारा.
🔸🔸🔸
दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला,
सौ......सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.
🔸🔸🔸
"चंद्राला पाहून भरती येते सागराला,
....... ची जोडी मिळाली माझ्या जीवनाला".
🔸🔸🔸
काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून ,
....... चं नावयेतं मात्र थेट माझ्या हृदयातून.
🔸🔸🔸
भाजीत भाजी पालक,
…... माझी मालकिन अन् मी मालक.
🔸🔸🔸
मनी असे ते स्वप्नी दिसे ओठी आणू मी हे कसे,
…...माझी नववधू, शब्दात मी हे सांगू कसे.
🔸🔸🔸
मातीच्या चुली घालतात घरोघरी,
….. झालीस तू माझी, आता चल माझ्या बरोबरी.
🔸🔸🔸
मायामय नगरी, प्रेममय संसार,
….... च्या जिवावर माझ्या जीवनाचा भार.
🔸🔸🔸
ग़जाननाच्या मंदिरात संगीताची गोडी,
सुखी ठेवा गजानना ….. आणि माझी हि जोडी.
🔸🔸🔸
गर्द आमराई त्यामध्ये पोपटांचे थवे,
….... चे नाव माझ्या ओठी यावे.
🔸🔸🔸
गाडीत गाडी डेक्कन क्वीन,
……… आहे माझी ब्युटी क्वीन.
🔸🔸🔸
आकाशात उडतोय पक्षांचा थवा,
…… चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.
🔸🔸🔸
आई-वडील, भाऊ बहीण, जणू गोकुळासारखे घर,
…. च्या आगमनाने पडली त्यात भर.
🔸🔸🔸
आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते गुंजन,
सौ ….. सोबत करतो मी सत्यनारायण पुजन.
🔸🔸🔸
मित्रांनो आमचे ( Marathi latest ukhane ) वर-वधूसाठी, स्त्री-पुरूषसाठी मराठी उखाणे तुम्हाला आवडले की नाही comment करा. आणि या पोस्टला मित्रांना शेअर करायला विसरू नका.🙏🙏
1 Comments
छान 👌👌
ReplyDelete